झिम्बाब्वेने दोन दिवसांत कसोटी जिंकली

हिंदुस्थान – इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथील कसोटीनंतर आता झिम्बाब्वे – अफगाणिस्तान यांच्यातील अबुधाबी येथील कसोटीही दोन दिवसांतच संपली. झिम्बाब्वेने 10 गडी राखून अफगाणिस्तानला पराभूत करीत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

अफगाणिस्तानचा पहिला डाव 131 धावांमध्येच गडगडला. झिम्बाब्वेने पहिल्या डावात 250 धावा फटकावल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही चमक दाखवता आली नाही. त्यांचा दुसरा डाव 135 मध्ये कोसळला. त्यामुळे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 17 धावांचे आव्हान उभे ठाकले.

प्रिन्स मॅसवॉर (नाबाद 5 धावा) व केव्हीन कसुझा (नाबाद 11 धावा) या सलामीवीरांनी झिम्बाब्वेला दिमाखदार विजय मिळवून दिला. या कसोटीत शतकी खेळी करीत दोन फलंदाजांना बाद करणारा झिम्बाब्वेचा कर्णधार सीन विल्यम्स सामनावीर ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या