पुणे जिल्हा परिषदेतील लाच स्वीकारणाऱ्या लेखापालला अटक

कामाचे बिल काढण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाच मागून 20 हजार रूपये स्वीकारणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातील लेखापालला अटक करण्यात आली आहे. विजय मधुकर चितोडे (वय 45) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत तक्रारदार तरूणाला पोस्ट कोवीड आणि उस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी पत्रक छापण्याचे काम मिळाले होते. पत्रक छापण्याचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी विजय चितोडे याने तक्रारदाराकडे 25 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये स्वीकारताना चितोडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या