पुलवामा हल्लेखोरांचा हिशोब चुकता केला – सीआरपीएफ महासंचालक झुल्फिकार हसन

1494

ज्यांनी पुलवामात हल्ला केला त्यांचा हिशोब चुकता केला गेला असे वक्तव्य सीआरपीएफच्या जम्मू कश्मीर विभागाचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी केले आहे. पुलावामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

हुसेन म्हणाले की, ‘पुलवा हल्ल्याचे जे मास्टरमाईंड होते त्यांना काही महिन्यांपूर्वीच मारण्यात आले आहे. ज्यांनी या हल्ल्यात मदत केली त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने तपास केला आहे. माझ्या माहितीनुसार त्यात योग्य प्रगती झाली आहे. शहिदांच्या कुटुंबीयांची आम्ही काळजी घेत आहोत’, असेही हुसेन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या