गोखले पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज रात्री ब्लॉक!

अंधेरी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या गोखले उड्डाणपुलाचे ओपन गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी-रविवारी चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक मध्यरात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यत असणार आहे. चर्चगेट ते विरारपर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची धीमी लोकल चर्चगेटहून रात्री 11.58 वाजता सुटेल आणि विरारला रात्री 1.40 वाजता पोहोचेल. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची धीमी लोकल चर्चगेटहून रात्री 11.52 वाजता सुटणार आहे. चर्चगेट ते वांद्रेपर्यंत डाऊन दिशेने जाणारी शेवटची धीमी लोकल चर्चगेटहून रात्री 1 वाजता सुटेल. विरार ते चर्चगेटपर्यंतची शेवटची धीमी लोकल विरारहून रात्री 11. 49 वाजता सुटेल तर बोरिवली ते चर्चगेटपर्यंतची शेवटची धीमी लोकल बोरिवलीहून रात्री 12.10 वाजता सुटणार आहे. विरार ते गोरेगावपर्यंतची शेवटची धीमी लोकल विरारहून रात्री 12. 05 वाजता सुटेल आणि रात्री 12. 50 वाजता गोरेगावला पोहोचेल.