
टी -20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकही षटक न टाकणारा आणि फलंदाजीतही चमक न दाखवू शकलेल्या हार्दिक पांडय़ासाठी आता ‘टीम इंडिया’तील परतीचा मार्ग खडतर बनला आहे. कारण हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हार्दिकला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) जाऊन आपला फिटनेस सिद्ध करायला सांगितले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत फ्लॉप राहिलेल्या हार्दिक पांडय़ाला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नाही. हिंदुस्थानचा संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणार आहे. हार्दिक पांडय़ाला एनसीएमध्ये फिटनेस सिद्ध करायला सांगितल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयासाठीदेखील त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.



























































