शिवसेनेचा उपक्रम, दहावीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रतिवर्षीप्रमाणे शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्रातर्फे विभागातील 16 शाळांमधील तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते महाराणी सईबाई विद्यामंदिर, अप्पापाडा येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

दहावीत शिकणाऱया गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘बडय़ा’ क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिका विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ही मुले गुणवत्ता असूनही बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण सराव प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या सात प्रश्नपत्रिका असलेले पुस्तकच विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

या वेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह उपमहापौर सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे, उपविभाग प्रमुख गणपत वारीस, प्रदीप निकम, चंद्रकांत मामा वाडकर यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी-कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

या विषयांच्या प्रश्नपत्रिका
मराठी, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-1, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-2, इतिहास-राज्यशास्त्र्ा, भूगोल-अर्थशास्त्र्ा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंग्लिश रीडर, हिंदी अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.