
कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी खारघरमध्य देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत ६२५ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा आयसीआयसीआय बँकेने केली आहे. त्यानुसार या केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन आज झाले असून बांधकामही सुरू झाले आहे. या केंद्रामुळे वर्षभरात २५ हजार कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपूर (नवीन चंदीगड) आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे प्रत्येकी एक अशा तीन अत्याधुनिक कॅन्सर केअर इमारतींच्या उभारणीसाठी बँकेने टीएमसीला १ हजार ८०० कोटी देण्याचे आश्वासन दिले आहे. आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन तसेच पायाभरणीचा समारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीपकुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संदीप बत्रा, अजय गुप्ता, टीएमसीचे सांचालक डॉ. सुदीप गुप्ता आदी उपस्थित होते.
११ मजले, साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम
तळमजला तसेच दोन बेसमेंट असलेली ही ११ मजली इमारत तीन लाख ४० हजार चौरस बांधण्यात येणार आहे. यामध्ये १२ अत्याधुनिक लिनियर एक्सिलरेटर्स आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असणार आहेत. या रेडिएशन थेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींना अचूक रेडिएशन दिले जाते. त्यामुळे आसपासच्या निरोगी ऊतींचे नुकसान कमी आहे. परिणामी ही उपचार पद्धत अत्यंत प्रगत समली जात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दोन लाख रेडिएशन सत्रांची सुविधा
आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी दरवर्षी ७ हजार २०० रुग्णांना रेडिएशन थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत रुग्णांची दोन लाखांहून अधिक रेडिएशन सत्रांची सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त वर्षभरात २५ हजार नवीन रुग्णांना ओपीडी सल्ला तसेच निदान करण्यास मदत होणार आहे. हे केंद्र २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.