
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरात विषेश मोहीम राबवून तब्बल 10 कोटी 40 लाख रुपये किमतीचा विविध ड्रग्ससाठा जप्त केला. या कारवाईत 10 ड्रग्स माफियांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थविरोधी कक्षाच्या सर्व युनीटने शहरात विशेष मोहीम राबवली. कांदिवली, धारावी, वडाळा टी.टी., गोरेगाव, वांद्रे, विलेपार्ले, मालवणी, नागपाडा, अंधेरी, माहीम या परिसरात धडक कारवाई करत पोलीस पथकांनी हायड्रोपहनिक गांजा, गांजा, एमडी असा तब्बल 10 कोटी 40 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्स जप्त केला. तसेच हा ड्रग्स बाळगून तो विकण्याच्या तयारीत असलेल्या 10 ड्रग्स माफियांना बेडय़ा ठोकल्या. या धडक कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे.





























































