
सामना ऑनलाईन । सातारा
नोट बंदी होऊन दीड वर्षे उलटले तरी सुध्दा आजही जुन्या नोटा बदलीचे सुळसुळाट सुरुच आहेत. सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातल्या पाचवड येथे चलनातून बाद झालेल्या दहा लाख रुपयांच्या जुन्या मोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत असणारया साताऱ्यातील पाचवड बैल बाजारात चलनातून बाद जुन्या चलनी नोटा बदलण्यासाठी एकजण येणार असल्याची खबर भुईंज पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी साफळा रचून नोटा बदली करण्यासाठी आलेल्या बाजीराव मोरे याला पोलिसांनी रंगे हात पकडले. पोलिसांनी मोरेची तपासणी केली असता त्याकडे असलेल्या बॅगेत दहा लाख रुपयांची चलनातून बाद झालेली रोकड आढळून आली. दरम्यान, नोटा बदलीच्या रॅकेट प्रकरणी भुईंज पोलिस बाजीराव मोरेची चौकशी करीत आहेत.






























































