
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. आदित्य संदीप खंडाळे (रा. जांब जि. बुलढाणा) असे मृत मुलाचे नाव आहे ही घटना सोमवारी उघडकीस आली.
भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे आपल्या आजोबाकडे शिक्षण घेत असलेला आदित्य हा रविवारी पाच वाजेच्या सुमारास मोहळाई येथे भागवत पांडुरंग पालकर यांच्या गट न.14 मधील शेततळ्यात पोहण्यासाठीr गेला असता यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. त्यानंतर पारध पोलिसासह ग्रामस्थ जमा झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संदीपचे आजोबा उत्तम मैनाजी पानपाटील यांच्या माहितीवरुनपारध पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे हे करीत आहे.


































































