
दिवाळीत पाडव्याच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल-रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. आज पहाटे 5.45 वाजता मंदिर सुरू करण्यात येणार आले. सध्या प्रत्येक तासाला फक्त 100 भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच दिवसभरात फक्त 1000 भाविकांना लाभ देण्यात येणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना फक्त पांडुरंगाच्या मुखदर्शनाचा लाभ मिळणार आहे, असा आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सायंकाळी व्हिडीओ का@न्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला शपुंतला नडगिरे, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा आदी उपस्थित होते.





























































