मुंबईत 103 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू

1306

महामुंबईत आज सायंकाळपर्यंतच्या कोरोना तपासणी अहवालानुसार नवे 103 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तपासणी झालेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या 55 रुग्णांचाही समावेश आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. यात तीन जणांचा मृत्यू अहवाल हा 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीमधील आहे. आज मृत्यू झालेल्या आठ जणांमध्ये सहा रुग्णांना दीर्घकालीन आजारही होते. तर दोन जण वयोवृद्ध होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आतापर्यंत 54 जण झाले कोरोनामुक्त

महामुंबईत 25 जानेवारीपासून आतापर्यंत  एकूण 433 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या तपासणी अहवालात 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पालिकेच्या माध्यमातून अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या