रस्ते अपघाताची धक्कादायक आकडेवारी आली समोर, चार वर्षांत 10 हजार 634 पादचाऱ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दररोज कुठे न कुठे अपघाताच्या दुर्दैवी घटना घडत असतात. वाहनांच्या अपघातात अनेक प्रवाशांचा नाहक जीव जातोच, पण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्यादेखील चिंताजनक असल्याचे आकडेवारी सांगते. गेल्या चार वर्षांत राज्यामध्ये रस्ते अपघातात तब्बल दहा हजार 634 पादचाऱयांनी आपला जीव गमावला आहे.

राज्यात वाहनांच्या अपघातांबरोबरच पादचाऱयांचा अपघाती मृत्यू होण्याची संख्या चिंतेची बाब ठरली आहे. रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना आवश्यक ती खबरदारी न घेता बेजबाबदारपणे वागल्यामुळे अपघात होऊन त्यात पादचाऱयांना नाहक जीव गमवावा लागत आहे. तर बऱयाच प्रकरणांत अपघातांमध्ये पादचारी गंभीर जखमी, किरकोळ जखमीदेखील होत असल्याचे चित्र आहे. केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण ठिकाणी, महामार्गावर पादचाऱयांचा अपघाती मृत्यू होण्याची संख्या चिंताजनक बनली आहे. वर्ष 2019 पासून ते वर्ष 2022 पर्यंत राज्यात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या एकूण 25 हजार 362 अपघातांत 10 हजार 634 पादचाऱयांना आपला जीव गमवावा लागला असून 12 हजार 637 पादचारी गंभीर जखमी झाले आहेत, तर चार हजार 200 पादचारी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातांमध्ये 115 पादचाऱयांना काहीच झाले नाही.

वर्ष एकूण मृत्युमुखी गंभीर किरकोळ

अपघात जखमी जखमी
2019 7294 2849 3774 1528
2020 5156 2214 2621 709
2021 6148 2677 2953 914
2022 6764 2894 3289 1049

– वर्ष 2019 मध्ये एक, वर्ष 2020 मध्ये 36, 2021मध्ये 19 तर वर्ष 2022 मध्ये 59 अपघातांत पादचाऱयांना काहीच झाले नाही.

पादचाऱयांचे कुठे चुकतेय

रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना पादचारी आवश्यक ती खबरदारी घेत नाहीत. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहत नाहीत, चिन्हांकित दिशादर्शकाचा वापर करीत नाहीत किंवा केला तरी दोन्ही बाजूला पाहत नाहीत. चालताना मोबाईल पह्न अथवा हेडपह्नचा वापर केला जातो. शक्य असतानाही फुटपाथचा वापर केला जात नाही. या आणि अशा कारणांमुळे पादचारी अपघातात सापडत आहेत.

रस्त्यावरून चालताना अथवा रस्ता ओलांडताना पादचाऱयांनी आवश्यक ती खबरदारी घेतलीच पाहिजे. अपघातापासून बचाव करण्यासाठी नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे व खबरदारीचे आहे.
– डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अपर महासंचालक (महामार्ग पोलीस)