बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 107 रुग्ण, आतापर्यंत 49 रुग्णांचा मृत्यू

बुलढाण्यात आज कोरोनाचे 107 रुग्ण सापडले आहेत. आज 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत 18462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2306 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 2306 आहे. आज रोजी 1216 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 18462 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3329 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 2306 कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 974 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 49 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या