रत्नागिरीत 24 तासात कोरोनामुळे 11 रुग्णांचा मृत्यू 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दोनशे पार गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. मागील चोवीस तासात 69 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6 हजार 605 वर पोचला आहे. आज 175 रूग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 4514 रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण 68.14 टक्के आहे. आज 11 जणांचा कोरोनानुळे मृत्यू झाला. मृत्यूची संख्या 211 वर पोहचली आहे तर मृत्यूचे प्रमाण 3.16 टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या