खेळताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेच्या मधल्या सुट्टीत मैदानात खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात ही घटना घडली. वेदिका झाटे (11) असे मृत मुलीचे नाव आहे.

वेदिका पाचवीत शिकत होती. 26 जून रोजी दुपारी खेळत असताना वेदिका चक्कर येऊन कोसळली. त्यानंतर शिक्षक मुलीला घरी घेऊन आले. यावेळी पालकांनी मुलीला दवाखान्यात का नेले नाही असे विचारले. यावर शिक्षकांकडे काहीच उत्तर नव्हते. त्यानंतर पालकांनी तातडीने मुलीला वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.