अंबडच्या सीआयई इंडिया आटोमोटिव्हमधील कामगारांना 11 हजारांची पगारवाढ; भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

नाशिकमधील अंबड येथील सीआयई इंडिया ऑटोमोटिव्हमधील कामगारांना शिवसेना नेते, खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस प्रकाश नाईक आणि युनिट कमिटीने व्यवस्थापनाशी केलेल्या करारानुसार 11 हजारांची पगारवाढ मिळाली आहे. भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे ही पगारवाढ झाली आहे.

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे कामगारांच्या पगारात 11 हजारांची वाढ झाली असून या रकमेच्या 50 टक्के रक्कम पहिल्या वर्षी, 25 टक्के रक्कम दुसऱया आणि 25 टक्के रक्कम तिसऱया वर्षी विभागून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सध्या मिळणारे इतर फायदे आणि सुविधा पुढे सुरूच राहणार आहेत. कराराचा कालावधी 3 वर्षांचा असून कराराची थकबाकीही कामगारांना मिळणार आहे. भारतीय कामगार सेनेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस प्रकाश नाईक, सहचिटणीस तानाजी फडोळ तर कंपनीच्या वतीने सीईओ राहुल देसाई, एचआर हेड इंडिया ऑपरेशन विनायक कडसकर, जनरल मॅनेजर एचआर रवींद्र वैद्य, प्लान्ट हेड महिंद्र साळुंखे, हेड एचआर संतोष शिंदे, कमिटीकडून युनियन अध्यक्ष श्याम चव्हाण, युनियन उपाध्यक्ष प्रशांत भगत, खजिनदार सुहास सरोदे, चिटणीस मुरलीधर कोळे, रावसाहेब भदाणे, सहचिटणीस पैलास घरटे यांनी करारावर सह्या केल्या.