माजलगाव तालुक्यातील 117 ऊसतोड मजूर अडकले मिरजमध्ये

688

तालुक्यातील तीन ते चार गावातील जवळपास 117 ऊसतोड मजुर सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी अडकले आहेत. त्यांना मागील पाच-सहा दिवसांपासून  निगराणीत ठेवण्यात आले असून असून या सर्व मजुरांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजलगाव तालुक्यातुन पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजुर ऊस तोडणीसाठी जात असतात. हे सर्व ऊस तोडणी कामगार  इचलकरंजी येथील  पंचगंगा साखर कारखान्यास गेले होते.  संचारबंदी लावल्याने हे सर्व कारखाने बंद करण्यात आले व मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठवण्यात आले. ते गावी परतत असताना त्यांना मिरज जवळ अडवुन त्यांना ढवळा या गावी निगराणीत ठेवण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यातील लवूळ, लिमगाव, ढोरगाव या गावातील 5 समूह असुन यात 100 मजुरांचा समावेश आहे. यात 40 महिला 20 बालके व 50 पुरुषांचा समावेश आहे. तर 4-5 जण गेवराई तालुक्यातील राजापुर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व मजूर दोन दिवसांपूर्वी रात्री या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी परत त्यांना पकडून आणले.मागील पाच-सहा दिवसांपासून  निगराणीत ठेवण्यात आले असून असून या सर्व मजुरांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या