
कर्जत – जामखेड मतदारसंघात चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तरी खरी लढत भाजपाचे प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अॅड. अरुण जाधवही आपले नशीब आजमावत आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी 4 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कर्जत – जामखेड मतदार संघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
यामध्ये पालकमंत्री राम शिंदे भाजपा, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शंकर मधुकर भैलुम-बहुजन समाज पार्टी, अरुण हौसराव जाधव-वंचित बहुजन आघाडी, अप्पासाहेब नवनाथ पालवे – मनसे, सोमनाथ भागचंद शिंदे- जनहित लोकशाही पार्टी , गोविंद लक्ष्मण आंबेडकर – अपक्ष, बजरंग मनोहर सरडे – अपक्ष, महारुद्र नरहरी नागरगोजे – अपक्ष, राम रंगनाथ शिंदे – अपक्ष, सुमीत कन्हैय्या पाटील – अपक्ष, ज्ञानदेव नरहरी सुपेकर – अपक्ष हे 12 उमेदवार आता रिंगणात राहिले आहेत. तसेच सोमवारीच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.
























































