
देशावर कोरोनाचे विनाशकारी संकट आले असताना केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये खर्चुन ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’चे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाचे काम तत्काळ बंद करा आणि हा पैसा कोरोनाविरुद्ध लढाईत वापरा. देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी खर्च करा, अशी महत्वपूर्ण मागणी देशातील प्रमुख 12 विरोधी पक्षनेत्यांनी संयुक्तपणे केली असून, यासंबंधीचे खरमरीत पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, माजी पंतप्रधान, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा, झारखंडचे मुख्यमंत्री, झामुमोचे अध्यक्ष हेमंत सोरेन, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, राजद अध्यक्ष तेजस्वी यादव, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, भापक नेते डी. राजा आणि जम्मू-काशमीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त पत्र पाठविले आहे.
या खरमरीत पत्रामध्ये प्रमुख 12 विरोधी पक्षांनी नऊ प्रमुख मुद्यांचा समावेश केला आहे. तसेच पेंद्र सरकारच्या उदासिन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीत हजारो कोटी रुपयांच्या ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’ची देशाला गरज नाही. हा पैसा कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरला पाहिजे. याकडे पत्रात लक्ष वेधले आहे. तसेच विरोधी पक्षांनी अनेकदा स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणेदेखील देशातील कोरोना परिस्थितीविषयी पेंद्र सरकारचे लक्ष वेधले, मात्र आपल्या सरकारने आमच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले पिंवा फेटाळल्या आहेत. त्यामुळेच देशात कोरोना स्थितीने गंभीर रूप धारण केले आहे, असे विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.
पत्रातील महत्त्वपूर्ण मागण्या
- देशांतर्गत लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी परवानगी मिळवणे सक्तीचे करावे.
- लसींसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला 35 हजार कोटींचा निधी खर्च करावा.
- गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करावे. पेंद्र सरकारच्या गोदामांमध्ये एक कोटी टन धान्य सडत आहे.
- कोरोना संकटात शेतकऱयांचे नुकसान टाळण्यासाठी पेंद्र सरकारने तीन कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत.
विरोधकांच्या मागण्या
- दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’चे काम तातडीने थांबविण्यात यावे आणि हा पैसा लसीकरणासाठी व ऑक्सिजन पुरवठय़ासाठी खर्च करावा.
- लसींचा पुरेसा साठा मिळवावा. त्यासाठी पेंद्र सरकारने जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही स्तरातून लस मिळवावी.
- देशातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी. त्यासाठी लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबवावा.
- देशातील खासगी ट्रस्टमधील निधी, तसेच पीएम-केअरमधील सर्व निधींचा वापर लसींसाठी, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी करावा.
- सर्व बेरोजगारांना सहा हजार रुपये प्रतिमहिना देण्यात यावेत.





























































