12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात फेरबदल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य प्रशासनात फेरबदल केले जात आहेत. राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे तर मिलिंद शंभरकर यांना म्हाडाचे सीईओ बनवण्यात आले आहे.

ओ. पी. गुप्ता यांना वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून संजय सेठी तर महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पराग जैन नैनोटिया यांना सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव बनवण्यात आले असून माहिती-तंत्रज्ञानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इतर नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत
कविता द्विवेदी – अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे
डॉ. हेमंत वसेकर – प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे
कौस्तुभ दिवेगावकर – पशुसंवर्धन आयुक्त, पुणे
कार्तिकी एन. एस. – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे
एम. जे. प्रदीप चंद्र – अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई
कावली मेघना – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट