सतत खोकणाऱ्या मुलाचा केला सिटीस्कॅन, रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले

प्रातिनिधीक फोटो

लहान मुलं खेळता खेळता काय तोंडात घालतील त्याचा नेम नसतो. अनेकदा मुलांनी खेळताना वस्तू गिळल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार कोलकात्यात उघड झाला असून एका 12 वर्षीय मुलाने चक्क पेनाचे टोपण गिळले होते. ते टोपण त्याच्या फुफ्फुस्सात अडकले होते.

pen-drop-agitation

पेनाचे टोपन गिळाल्यानंतर त्या मुलाला सतत खोकल्याचा त्रास होत होता. त्याच्या पालकांनी त्याला डॉक्टरकडेही घेऊन गेले. मात्र सुरुवातीला डॉक्टरांनी त्याला खोकल्याची औषधं दिली. मात्र तरिही त्या मुलाचा खोकला थांबत नव्हता. दोन महिने उलटले तरी खोकला थांबत नसल्यामुळे मुलाच्या पालकांनी त्याला स्पेशालिस्ट डॉक्टरकडे नेले. त्या ड़ॉक्टरांनी त्याला सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. मुलाचा सिटीस्कॅनही करण्यात आला. मात्र त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले. मुलाच्या फुफ्फुस्सात पेनाचे टोपन अडकले होते. पेनाच्या टोपनामुळे फुफ्फुस्सात संसर्ग देखील झाला होता. डॉक्टरांनी त्या मुलावर शस्त्रक्रिया करून ते टोपन काढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या