वर्षाचा पगार 121 कोटी! या व्यक्तीने अंबानींना देखील मागे टाकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
2000-note

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एचईजी लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) रवि झुनझुनवाला यांनी आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 121.37 कोटी रुपये पगार घेतला आहे. तर रिलायन्स समूहाच्या (RIL) वार्षिक अहवालानुसार मुकेश अंबानी यांचे वेतन 15 कोटी रुपये इतके होते.

एलएनजी भीलवाडा समूहाची कंपनी HEG लिमिटेज ग्रॅफाइट इलेक्ट्रोडचे उत्पादन करते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झुनझुनवाला यांच्या पगारात गेल्यावर्षीपेक्षा तीन पट जास्त वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. खरे तर झुनझुनवाला यांना कंपनीच्या नियमांनुसार कंपनीच्या नफ्यातील 2.5 टक्के कमीशन दिले जाते. ज्यामुळे पगार 119 कोटी रुपये कमीशनच्या रुपाने झाला आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार 2017-18 मध्ये झुनझुनवाला यांचा वार्षिक पगार हा 43.33 कोटी रुपये इतका होता. दरम्यान, अद्याप सर्व कंपन्यांची माहिती जाहीर झालेली नाही. सर्व माहिती झाल्यानंतर कदाचित झुनझुनवाला यांच्यापेक्षा अधिक पगार घेणारे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी अधिकारी यांची समोर येण्याची शक्यता आहे. मात्र सध्याचे आकडे बघता झुनझुनवाला हेच सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती ठरले आहेत.