तस्कराकडून आणखी 1250 एलएसडी स्टॅम्प जप्त, आतापर्यंत 1 कोटी 16 लाखांवर ऐवज जप्त

ऑनलाईन फूड डिलीव्हरी अपद्वारे एलएसडी स्टॅमची तस्करी करणाऱया उच्चशिक्षिताकडून आणखी 1 हजार 250 नशेली एलएसडी जप्त केल आहेत. बाजारपेठेत त्याची किंमत 62 लाख 70 हजार रुपये आहे. आतापर्यंत पाचही आरोपींकडून तब्बल 1 कोटी 16 लाख 32 हजारांवर अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील काही दिवसांतील अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली ही सर्वात मोठी स्टॅमची कारवाई असल्याचे उघडकीस आले आहे.

रोहन दिपक गवई वय 24 रा. डिपी रोड, कर्वे पुतळा, सुशांत काशिनाथ गायकवाड वय 26 रा. संभाजीनगर, कोडोली सातारा सध्या बाणेर, धिरज दिपक लालवाणी वय 24 रा. पिंपळे-सौदागर, दिपक लक्ष्मण गेहलोत वय 25 आनंदनगर आणि ओंकार रमेश पाटील, वय 25 रा. पाटील साई व्हिला,वाकड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केलेल्या आरोपींपैकी ओंकार पाटीलकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने दुचाकीच्या डिक्कीत एलएसडी स्टॅम ठेवल्याचे सांगितले.