पहिल्यांदा मासिक पाळी आली, अल्पवयीन मुलीने घाबरून केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पहिल्यांदा मासिक पाळी आल्याने एक 12 वर्षाची मुलगी चांगलीच घाबरली आणि तिने आत्महत्या केली. दिल्लीतली ही घटना असून सदर मुलगी संत नगरमध्ये राहत होती व पाचवीत शिकत होती.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी मुलगी आपल्या खोलीत एकटीच होती. तेव्हा ओढणीच्या साहाय्याने तिने पंख्याला लटकून आत्महत्या केली. कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी मुलीला जवळच्या इस्पितळात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुलीने मरण्यापूर्वी कुठलीच चिठ्ठी लिहिली नव्हती. मुलीच्या मोठ्या बहीणीने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी तिच्या बहीणाला पहिल्यांदा मासिक पाळी आली. या गोष्टीचा तिने चांगलाच धसका घेतला. मोठ्या बहीणीने तिला समजावयचा खूप प्रयत्न केला. परंतु तिचा तणाव काही गेल्या कमी झाला नाही. याच कारणाने तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

पूर्वी मुलींना 13 किंवा 14 व्या वर्षी मासिक पाळी सुरू व्हायची. परंतु आता 11 किंवा 12 व्या वर्षीच मुली वयात येतात. या बदलासाठी मुली मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. तसेच मुलींना यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.