
एमआयडीसी निवासी परिसरात केबल फॉल्टमुळे पहाटे साडेतीन वाजल्यापासून तब्बल 13 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. स्नेहगंधा सोसायटी आरएच-20 तसेच परिसरातील सोसायट्यांचा वीजपुरवठा अचानक बंद झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.
तपासणीत केबल फॉल्ट झाल्याचे निदर्शनास आल्याने खासगी कंत्राटदारामार्फत केबलला जॉइंट मारण्याचे काम करण्यात आले. अखेर दुपारी साडेचारनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, केबल व पोलवरील तांत्रिक बिघाड तसेच उच्च दाब वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे अथवा स्पर्श होणे यामुळे परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान येथील विद्युत साधनांची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.


























































