जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दिला वंचितांना शाळा प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

साखळी बुद्रुक येथील शाळेपासून वंचित नंदनवन आश्रमातील आश्रीत मुलांना साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न केले.

बुलढाणा परिसरात नावारुपास येत असलेल्या साखळी बुद्रुक येथील नंदनवन परिवार निराधार मुलांचे संगोपन करत आहे. त्यांच्याकडे आजुबाजुच्या परिसरातील गोरगरीब, अनाथ, असहाय्य, मुले-मुली आहे. ते शिक्षणापासून वंचित राहु नये या हेतुने नंदनवन परिवाराचे संचालक व पालक अजय दराखे व लक्ष्मी दराखे यांना साखळी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना शाळेत आश्रमाच्या मुलांना दाखल करण्याची विनंती केली होती. या विनंतीवरुन नंदनवनचे एकूण 13 मुले-मुली शाळेत दाखल करण्यात झाली आहेत. या मुलांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी नंदनवनचे दराखे दाम्पत्य व दाखल विद्यार्थी यांचा भावनिक सत्कार करण्यात आला. गावातील सामाजिक कार्यकर्ते गोविंदा यांनी या विद्यार्थ्यांना वाहतुकीची सोय उपलब्ध करुन दिल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले. शाळेत प्रवेश झाल्यावर मुलांनाही आनंद झाला. शाळेचे शिक्षक गजानन शेळके व किरण वाघमारे यांनी या मुलांचे शाळा प्रवेशासाठी प्रयत्न केले. या विद्यार्थ्यांना भविष्यातही लागेल ती मदत शिक्षकांमार्फत केली जाणार आहे असे शिक्षक कैलास औटी यांनी सांगितले.