13 वर्षाच्या मुलीवर वडिलांकडून वारंवार बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिथिक फोटो

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे 47 वर्षाच्या वडिलांनी 13 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची तसेच अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पेशाने ड्रायव्हर आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच, बेलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आरोपीस दोन अल्पवयीन मुली आहेत. एक मुलगी 13 वर्षांची असून दुसरी 12 वर्षांची आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी 12 वर्षीय मुलीसोबत छेडछाड करत होता आणि 13 वर्षीय मुलीसोबत वारंवार बलात्कार करत होता. आरोपीने मुलींना धमकी दिली होती की, याबद्दल बाहेर कोणाशीही चर्चा केली तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

याचा खुलासा झाल्यावर आरोपीच्या विरूध्द भारतीय दंड संहिता ( आयपीसी ) च्या कलम 354 आणि 376 नुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला, तसेच बाल लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो ) कायद्यांतर्गत प्रकरण नोंदवले आहे.