
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण संपूर्ण गावासमोर तिचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर ज्या व्यक्तीने तिचे अपहरण केले त्याच्यासोबतच तिचे लग्न लावून देण्यात आले.
कविता बाई असे त्या मुलीचे नाव असून बाहलकानी जमातीतील अहमद नावाच्या व्यक्तीने त्याच्या मित्रांच्या मदतीने 8 मार्च रोजी तिचे अपहऱण केले होते. कविता तिच्या कुटुंबीयांसोबत घरी झोपलेली असताना पाच गुंड तिच्या घरात घुसले. त्यांच्यासोबत अहमदही होता. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत तिचे अपहरण केले. त्यानंतर कविताला तंगवानी गावात आणून तिचे सर्व गावासमोर धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा अहमदसोबत निकाह करण्यात आला.
मुलीच्या अपहरणानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुलगी न्यायालयात हजर झाल व तिने आपण 18 वर्षाच्या असून स्वच्छेने पळून गेल्याचे सांगतिले. त्यानंतर पोलिसांनी तिची पुन्हा चौकशी केली असता तिने आपण आई वडिलांच्या इच्छेविरोधात लग्न केले असून आपल्याला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.
मुलीने अशा प्रकारे उलटा दावा केल्यानंतरही पोलिसांनी बालविवाह कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुलीचे नक्की वय किती आहे याचा पोलीस तपास करत आहेत.




























































