कश्मीरसाठी केंद्राचे 1 हजार 350 कोटींचे पॅकेज, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची घोषणा

कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या जम्मू-काश्मीरातील उद्योग, व्यावसायिकांसाठी 1 हजार 350कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पॅकेजची घोषणा केली. हे 1350 कोटी रुपयांचे पॅकेज अतिरिक्त असणार आहे असे उपराज्यपाल सिन्हा यांनी सांगितले.

  • चालू आर्थिक वर्षात व्यावसायिकांना कर्जामध्ये पाच टक्के सूट दिली जाणार आहे. ही योजना सहा महिन्यांसाठी असेल.
  • जम्मू-काश्मीर बँकेद्वारे आरोग्य-पर्यटन योजना आणली जाईल.
  • तरुण आणि महिला उद्योजकांसाठी एक ऑक्टोबर पासून जम्मू-काश्मीर बँकेकडून विशेष डेस्क सुरु करण्यात येईल.
  • पाणी, वीजबिल, स्टॅम्प ड्युटीत घसघशीत सूट
  • पाणी आणि वीज बिलात 50 टक्के सूट देण्याची घोषणा उपराज्यपाल सिन्हा यांनी या पॅकेजमध्ये केली.मात्र केंद्र शासित प्रदेश प्रधान सचिव रोहित कंसल यांनी याबाबत खुलासा केला आहे.ही 50 टक्के सूट बिलात नाही तर औधोगिक आणि व्यासायिक वापर करणाऱ्य़ांच्या फिक्स्ड डिमांड चार्जेसवर सूट असेल.
  • सर्व उधार घेणाऱ्य़ा प्रकरणांवर स्टॅम्प ड्युटीमध्ये मार्च 2021 पर्यंत 50 टक्के सूट असेल.
आपली प्रतिक्रिया द्या