
आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 जण बेपत्ता झाले असून राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरला आहे. कडप्पा जिल्ह्यात 10 जण पुरात वाहून गेले आहेत. तर चित्तूर जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
रायलसीमा विभागात अनेक रस्त्यांन नद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत तर गाड्य पुराच्य पाण्यात वाहून गेले आहेत. राज्यात आतापर्यंत दीड हजारहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तसेच साडेतीन हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे. हजारो गुरं पाण्यात वाहने गेले आहेत. रायलसीमा भागात पावसामुळे आतापर्यंत हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कडप्पा जिल्ह्यातील राजमपेटा भागात पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तर चेयेरू भागात 12 जण वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. एसडीआरफ आणि ओलिसांनी कडप्पा आणि चित्तू जिल्ह्यात 10 जणांना पुरातून वाचवले आहे. अनंतपूर जिल्ह्यात चित्रावती नदील आलेल्यापुरामुळे 10 जण अडकले होते. हवाई दलाने या 10 जणांची सुटका केली आहे. राज्यात 213 छावण्या उभारल्या असून त्यात 19 हजार 859 जणांनी आसरा घेतला आहे.




























































