
सामना ऑनलाईन । सुकमा
नक्षलवाद्यांविरोधात सरकारने छेडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडमध्ये जवान आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच १६ शस्र जप्त करण्यात आले आहेत.
Chhattisgarh: 14 naxals killed in an encounter with security forces near Sukma’s Konta and Golapalli police station limits, 16 weapons recovered.
— ANI (@ANI) August 6, 2018
सरकारविरोधात पाऊले उचलत गावकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाईचे सत्र अद्याप सुरू आहे. छत्तीसगडमधील सुकमाच्या जवळच्या कोंटा आणि गोलापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदुस्थानचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईपैकी ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.



























































