अखेर CAA अंतर्गत 14 लोकांना मिळाले नागरिकत्व प्रमाणपत्र

caa

केंद्रानं नियम अधिसूचित केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच बुधवारी 14 लोकांना जारी करण्यात आला. CAA अंतर्गत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक कारणास्तव छळ झालेल्या अल्पसंख्याकांना हिंदुस्थानात नागरिकत्व मिळू शकते.

नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) संसदेने मंजूर केल्याच्या चार वर्षांनंतर 11 मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) नियमांची अधिसूचना जारी केली.

बुधवारी 14 लोकांना त्यांच्या अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया केल्यानंतर नागरिकत्व प्रमाणपत्रे मिळाले. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.