CAB वरून उत्तर प्रदेशात वाढला तणाव, जमावबंदी लागू

452

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर दिल्लीनंतर उत्तर प्रदेशमध्येही तणाव वाढला आहे. लखनौ विद्यापीठात दगडफेक झाली आहे. तसेच नदवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन करून घोषणाबाजी केली होती. रविवारी सकाळी आंदोलना दरम्यान दगडफेकही झाली. तणावाचे वातावरण पाहता प्रशासनाने राज्यात कलम 144 लागू करून जमावबंदी केली आहे.

तर दुसरीकडे अलीगढ विद्यापीठ रिकामे केले जात आहे. नागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी आंदोलन केले होते तसेच पोलिसांवर त्यांनी दगडफेकही केले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला परंतु विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अलीगड मुस्लिम विद्यापीठातील दगडफेकीच व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून लखनौमध्ये रविवारी रात्री साडे दहा ते आज सोमवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत इंटरनेट बंद केले आहे. सहरानपुरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

अलाहबाद विद्यापीठाने सुटी घोषित केली असून अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दुपारी 12 वाजता विद्यार्थी आंदोलानासाठी परवानगी मागितली आहे. म्हणून सरकारने विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले होते. अलाहबादमधील सर्व परीक्षा आता 10 जानेवारीपासून होणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या