पनवेलमध्ये कोरोना बाधितांची संख्या 15 वर, सीआयएसएफ जवानांचा समावेश

1011

कोरोना विषाणू बाधिताची रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 वर पोहचली आहे. त्यामुळे पनवेल हे सध्या कोरोनाचे हॉट डेस्टिनेशन ठरत असून ही आरोग्य यंत्रणेसमोर आणि नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 15 पैकी 13 बाधित हे सीआयएसएफ जवान आहेत. त्यामुळे रायगडच्या वेशीवर असलेले पनवेल शहरच कोरोनाग्रस्तांनी वेढण्यास सुरुवात झाली आहे.

रायगडातील 15 पैकी 14 तालुके हे कोरोना मुक्त आहेत. रायगडची हद्द सुरू होणारे प्रवेशद्वार असलेला पनवेल तालुका मात्र कोरोनाग्रस्त बाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पनवेलमधील संक्रमित रुग्णांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील 257 जणांना कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 36 जणांची नमुना तपासणी घेण्याची गरज नव्हती. 221 जणांची नमुने तपासणी केली असून 189 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. 17 जणांचे रिपोर्ट अजून प्रलंबित आहेत. तर एकचा पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे.

2 एप्रिल रोजी जिल्ह्यात 7 कोरोना बाधितांची संख्या होती तर आज 8 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असून आता ही संख्या 15 वर पोहचली आहे. वाढलेले 8 रुग्ण हे सीआयएसएफ जवान असून ते एकाच कॉलनीत राहत असल्याने एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांना लागण झाली आहे. मात्र पनवेल मधील बा धितांचीवाढती ही संख्या चिंतेची बाब ठरली आहे. तर अजून मरगजमध्ये गेलेल्या 12 जणांचे रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याने पनवेलकराचे चिंता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या