एक्सिस बँकेतील 15 हजार कर्मचार्‍यांनी सोडली नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यात एक्सिस बँकेच्या 15 हजार कर्मचार्‍यांनी नोकरी सोडली आहे. यात मध्यम स्तरातील कर्मचार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. नव्या मॅनेजमेंटसोबत काम करणे त्यांना जमत नव्हते असे कारण समोर येत आहे.

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही महिन्यात अनेक वरिष्ठ कर्मचार्‍यांनी बँकेला रामराम केला आहे. नवीन बदल स्विकारण्यास हे कर्मचारी अयशस्वी ठरत आहेत. तसेच बँकेने नवीन कर्मचार्‍यांचीही मोठ्या प्रमाणात भर्ती केली आहे. बँकेने आपल्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. अनेक कर्मचारी या व्यवस्थेशी एकरूप होण्यास घाबरत होते. आतापर्यंत 15 हजार कर्मचार्‍यांनी एक्सिस बँक सोडल्याची माहिती आहे.