१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे

32

सामना प्रतिनिधी । लातूर

१५० फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे पाहून नागरिकांना सैन्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण होऊन त्यांच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना जागृत राहील. लातूरकर नागरिकांनी रोजच्या जीवनातील सध्या साध्या नियमांचे पालन केल्यास त्यातून देशभक्तीच दिसून येईल. तर हा १५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा तर लातूरकरांच्या देशभक्तीच प्रतीक असून “नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट इव्हनिंग”चा नारा देऊन लातूरचा नवीन पॅटर्न तयार केल्यास त्यास देशपातळीवर घेऊन जाऊ, असे आश्वासन शालेय शिक्षण, उच्च-तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनातून १५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, वर्षा तावडे, आमदार विक्रम काळे, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, माजी खासदार रुपा पाटील, जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, क्रीडा उपसंचालक मोराळे, क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ, समाजकल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री तावडे म्हणाले की, या राष्ट्रध्वज लोकार्पण कार्यक्रमांसाठी ११५२० विद्यार्थी उपस्थित ते ही उन्हात व व्यासपीठावरील मान्यवरही उन्हात आहेत. यातून लातूरकरांची संवेदनशीलता दिसून येते. तसेच १५० फुट उंच राष्ट्रध्वज आपणास दररोज दिसणार असून त्यातुन सैन्य व त्यांच्या कुटुंबियांप्रती उत्तरदायित्व तसेच दैनंदिन जीवनात नियमांचे पालन केल्यास देशभक्ती दिसेल, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या