
सामना ऑनलाईन । अलिबाग
गेल्या आठ दिवसांपासून धुवाधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिह्यातील 28 पैकी तब्बल 16 धरणे तुडुंब भरली आहेत. उर्वरित 12 प्रकल्पांमध्येही सरासरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असून पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच ही धरणेदेखील ओव्हरफ्लो होतील. या सर्व धरणांमध्ये सद्यस्थितीत 67.669 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा तयार झाला आहे.
रायगड जिह्यात पडत असलेल्या पाकसामुळे जिह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या 28 पैकी 16 धरणे पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. बळीराजाही समाधानी असून भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, खैरे, भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे, उसरण ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. करंध व कोथुर्डे ही दोन धरणे 90 टक्के भरली आहेत. 28 धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या 67.669 टक्के पाणीसाठा आहे. हेटवणे, पान्हालघर, आंबोली ही मध्यम प्रकल्पाची धरणे 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.
- रायगड जिह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत 20920.80 मिमी पाऊस पडला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या 42.25 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.
- जिह्यात सोमकारी 45.90 च्या सरासरीने 734.40 मिमी पाकसाची नोंद झाली. आतापर्यंत जिह्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या 37.10 टक्के पाऊस पडला आहे.
कुठे किती पाऊस
अलिबाग 6.00, पेण 86.20, मुरुड 88.00, पनकेल 15.00, उरण 13.00, कर्जत 39.20, खालापूर 66.00, माणगाक 50.00 रोहा 39.00, सुधागड 44.00, तळा 79.00, महाड 42.00, पोलादपूर 35.00, म्हसळा 21.00, श्रीकर्धन 40.00, माथेरान 71.00 मिमी.






























































