‘चांद्रयान-3’साठी आजचा दिवस महत्त्वाचा

इस्रोने बुधवारी चौथ्यांदा ‘चांद्रयान-3’ची कक्षा बदलली. आता 17 ऑगस्ट हा दिवस ‘चांद्रयान-3’साठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे. उद्या, गुरुवारी इस्रो ‘चांद्रयान-3’च्या प्रोपल्शन मॉडय़ुलला लँडरपासून वेगळे करणार आहे, तर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग होणार आहे.