17 वर्षांच्या रंगनाथनने लाखो प्रवाशांचा डेटा केला सुरक्षित, ‘आयआरसीटीसी’मधील चूक शोधली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईमधील 17 वर्षीय मुलाने रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट फ्लॅटफॉर्मवरील एक ‘बग’ दूर करण्यात मदत केली आहे. त्या ‘बग’मुळे हिंदुस्थानातील लाखो प्रवाशांची खासगी माहिती उघड झाली असती. रंगनाथन असे या मुलाचे नाव आहे. रंगनाथनच्या सतर्कतेचे सगळे कौतुक करत आहेत.

ऑनलाइन तिकीट बुक करत असताना रंगनाथनला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर बग आढळला. याविषयी रंगनाथने सांगितले की, वेबसाइटवरील गंभीर इनसिक्योर ऑब्जेक्ट डायरेक्ट रेफरन्समुळे त्याला इतर प्रवाशांची माहिती मिळाली. यामध्ये अन्य प्रवाशांचे नाव, वय, पीएनआर क्रमांक, ट्रेनबद्दलची माहिती, जाण्या-येण्याची ठिकाणं आणि प्रवासाची तारीख असेच बरेच तपशील होते. तसेच इतरांच्या माहितीमध्ये फेरफारदेखील करता येत होते. बॅक अँड कोड सारखाच असल्याने, हॅकर दुसऱया प्रवाशाच्या नावाने जेवणाची ऑर्डर देऊ शकतो, बार्ंडग स्टेशन बदलू शकतो. प्रवाशाच्या माहितीशिवाय त्याचे तिकीटदेखील रद्द करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे यामुळे लाखो प्रवाशांच्या डेटाबेसमध्ये फेरफार होऊ शकतो तसेच डेटाबेस लीक होण्याचा धोकाही आहे.

आयआरसीटीसीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रंगनाथनने 30 ऑगस्ट रोजी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला या प्रकरणाची तक्रार केली होती आणि आयआरसीटीसीला सतर्क केले होते. त्याच्या तक्रारीनंतर पाच दिवसांत हा बग दूर करण्यात आला. रंगनाथन तांबरम येथील खासगी शाळेत बारावीत शिकतो.