
लातूरमध्ये आज कोरोनाचे 175 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 180 वर पोहोचली आहे. आज उपचारादरम्यान सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरणामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या लातूर जिल्ह्यात 218 वर पोहोचली आहे.
जुलै महिन्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये वाढत जाणारा कोरोणाचा आलेख कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नाही. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लातूर जिल्ह्यात पुन्हा 175 रुग्णांची वाढ झाली असून आज पर्यंत जिल्ह्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या तब्बल 6180 वर जाऊन पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या रूग्णांची संख्या 218 झाली असून दिलासादायक बाब म्हणजे 4 हजार 362 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. 1600 रुग्णांवर सध्या लातूर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.























































