175 पोलीस निरीक्षक एसीपी बनले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बनायचे 175 पोलीस निरीक्षकांचे स्वप्न आज साकार झाले. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर गृह विभागाने राज्यातील 175 निरीक्षकांना एसीपीपदी बढती दिली. आज होईल उद्या होईल अशा प्रतीक्षेत असलेले राज्यातील पावणे दोनशे निरीक्षकांना सरकारने अखेर गोड बातमी दिली. राज्य सरकारने मोठय़ा संख्येने निरीक्षकांना एसीपीपदी बढती दिली. 90, 91, 92 क 93 च्या बँचमधील अधिकाऱ्यांना बढती दिल्याने राज्यात रिक्त असलेली एसीपींची अर्धेअधिक पदे आता भरली जातील. वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी एसीपी बनले. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या निरीक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.