युक्तिवादासाठी 18 ऑक्टोबरची डेडलाइन, अयोध्याप्रकरणी अंतिम निकाल नोव्हेंबरमध्ये

176

सामाजिक, धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल  नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर दिवशी चालणार्‍या खटल्याला एक तास जास्त घ्या, प्रसंगी शनिवारीही खटला चालवा पण खटल्याची अंतिम सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना दिले. ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता आहे.

सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याने पत्र लिहून श्रीरामजन्मभूमी प्रकरणात पुन्हा मध्यस्थि करण्याची विनंती केली आहे. त्यावर बोलताना न्यायालय म्हणाले, ‘सुनावणी सुरू असतानाच पक्षकार मध्यस्थीची बोलणीही सुरू ठेवू शकतात. त्यांना रोखलेले नाही.’

वेळ कमी पडल्यास शनिवारीही खटला चालवा!

श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील पक्षकारांनी युक्तिवादासाठी दिलेला अवधी पाहून या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. पण हा वेळ कमी पडत असेल तर खटल्याचा दर दिवशीचा एक तासाचा वेळ वाढला आणि तोही जर कमी पडत असेल तर शनिवारीही खटला चालवा, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले.

डेडलाइन ऑक्टोबरचीच का?

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातच या खटल्याचा निकाल यावा अशी त्यांची इच्छा आहे. ऑक्टोबरमध्ये खटल्याची अंतिम सुनावणी झाली तर निकाल लिहिण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत निकाल येणे शक्य होईल.

आपली प्रतिक्रिया द्या