नोकरीच्या आमिषाने 18 जणांची 15 लाखांची फसवणूक; दोघांना अटक, पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी नोकरी लावतो, असे सांगून सातारा, सांगली व पुणे जिह्यातील 18 जणांची 15 लाखांची फसवणूक करणाऱया मारुती जयवंत साळुंखे (रा. नरोटेवाडी, ता. इंदापूर), प्रवीण राजाराम येवले (रा. वडी, ता. खटाव) यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रमेश पोपट ढावरे यांनी दोन दिवसांपूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कोल्हापूर किंवा दहिवडी तहसील कार्यालयात शिपाई म्हणून नोकरीस लावतो, असे सांगून आरोपींनी 2017 मध्ये त्याच्याकडून 20 हजार रुपये घेतले होते. संशयितांनी 10 हजार रुपये हे साळुंखे याला रोख स्वरूपात व 10 हजार रुपये बँक खात्यावर भरून घेतले. त्यानंतर तक्रारदार युवकाने संशयितांकडे वारंवार नोकरीबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ढावरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावर शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, शशिकांत भोसले, पंकज मोहिते, नीलेश निकम यांनी केली.