
सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर केल्यावर काही लोकांना किती लाईक्स, कमेंट मिळाल्या हे पाहण्याची सवय असते. अनेकदा पोस्टला जास्त लाईक्स न मिळल्यानेमन खट्टू देखील होते. सतत पोस्टवरील लाईक्स, कमेंट पाहणे हा एक मानसिक आजार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे फेसबुक पोस्टला जास्त लाईक्स न मिळाल्याने 19 वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याचे उघड झाले आहे. तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
सदर प्रकार लांचेस्टर येथील असून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव क्लोय डेव्हीसन असे आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळला होता. मात्र सुसाईड नोट न मिळाल्याने यामागील कारण स्पष्ट झाले नव्हते. अखेर 8 महिन्यांनी या कारणांचा उलगडा झाला असून फेसबुक पोस्टला कमी लाईक्स मिळाल्याने क्लोय डेव्हीसनने आत्महत्या केल्याची उघड झाले.

क्लोय डेव्हीसन दिसायला सुंदर होती आणि हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होती. रोज सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची तिला आवड होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने काही फोटो अपलोड केले होते, मात्र त्याला जास्त लाईक्स मिळाले नव्हते. फेसबुक पोस्टला लाईक कमी मिळाल्याने क्लोय तणावात असायची असे तिच्या मित्रांनी सांगितले. आत्महत्या करण्याआधी देखील तिने मित्रांना फोन करून मला कोणी पसंद करत नाही, मी कोणालाही आवडत नाही असे म्हणत होती. आता तिच्या मृत्यूनंतर तिची आई तरुणांना जागरूक करत असून व्हर्चुअल जगात वावरू नका असे आवाहन करत आहे.



























































