रत्नागिरीत 2 हजार 773 शाळांमध्ये भरले वर्ग; पहिल्या दिवशी 71 हजार 346 विद्यार्थी हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडमुळे बंद पडलेल्या पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या. रत्नागिरीत बुधवारी पहिल्या दिवशी पहिली ते चौथीच्या 2 हजार 559 शाळा सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील पहिली ते चौथी इयत्तेतील 54 हजार 190 विद्यार्थ्यांनी आणि पहिली ते सातवीच्या शहरी भागातील 17 हजार 156 विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती नोंदवली.

आजपासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या 2 हजार 600 शाळा आहेत. त्यापैकी 2 हजार 559 शाळा आजपासून सुरु झाल्या. या शाळेतील 59 हजार 398 विद्यार्थ्यांपैकी 54 हजार 150 विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत हजर होते. शहरी भागातील पहिली ते सातवीच्या 156 शाळांपैकी 154 शाळा सुरु झाल्या. या शाळांतील 21 हजार 399 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 156 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. जिल्ह्यातील 6 हजार 284 शिक्षकांपैकी 5 हजार 974 शिक्षक शाळेत हजर होते. मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरमध्ये ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या सर्वच शाळा आज सुरु झाल्या. शहरी भागात खेड, मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमधील सर्व शाळा आजपासून सुरु झाल्या.