
दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आज शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करली. शामल झुरु पुडो ऊर्फ लीला (36) आणि काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी (24) अशी त्यांची नावे असून या दोघींवर तब्बल 53 गुह्यांची नोंद आहे. महाराष्ट्र सरकारने शामलवर 8 लाखांचे तर काजलवर 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडेपाच लाख व साडेचार लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.


























































