अकरावी प्रवेशासाठी दोन लाख ३१ हजार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा आज सोमवार अखेरचा दिवस होता. अकरावी प्रवेशासाठी दोन लाख ३१ हजार ३९१ अर्ज आले असून या प्रवेशाची पहिली नियमित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईत अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २५जूनपर्यंत अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरता येणार होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली.

अकरावी प्रवेशासाठी दोन लाख ३२ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी दोन लाख ३१ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा अर्जाचा दुसरा भाग भरून अर्ज सादर केले. या प्रवेशाची पहिली विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीतील नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.