
कोरोनाशी लढा देत असताना मुंबई महापालिकेला आता पावसाळी आजाराशी सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मलेरियाने दोघांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पावसाळी आजारांचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी आहे. मुंबईत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 824 रुग्ण सापडले होते. तर यंदा ऑगस्टमध्येच 592 रुग्ण सापडले आहेत. मात्र, मागील वर्षी एकही मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे यंदा रुग्ण कमी असले तरी झालेले मृत्यू ही पालिकेसमोर चिंतेची बाब आहे. मुंबईत मलेरियापाठोपाठ ऑगस्टमध्ये लेप्टोचे 16, गॅस्ट्रोचे 23, हेपेटायटीसचे 5 आणि डेंग्यूचे 6 रुग्ण आढळले आहेत.


























































