
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार दरम्यान विशेष शुल्कासह 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
08101 समर स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 18.6.2022 रोजी 22.00 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी 11.35 वाजता शालिमार येथे पोहोचेल.
08102 समर स्पेशल शालिमार येथून दि. 14.6.2022 रोजी 15.35 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 04.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीमध्ये दोन द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान आणि 2 द्वितीय आसन श्रेणीसह ब्रेक व्हॅन असणार आहे.
या गाड्यांना विशेष थांबे दिली आहे. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव (फक्त 08101 साठी), बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी, नागपूर.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
विशेष ट्रेन क्र. 08101 साठी बुकिंग विशेष शुल्कासह दि. 15.6.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर मिळेल.

































































